वृत्तसंस्था/ बुचारेस्ट, रोमानिया
भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने उझ्बेकच्या नोदिरबेक अब्दुसत्तोsरोव्हचा सुपरबट चेस क्लासिक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का दिला. पांढऱ्या मोहरांनी खेळताना प्रज्ञानंदने चमकदार प्रदर्शन केले. त्याने ग्रुनफेल्ड बचावाचा अवलंब केला आणि पांढऱ्या मोहरांची रचना उत्कृष्ट असल्याचे सिद्ध झाले. वजिरांची मारामारी झाल्यानंतर प्रज्ञानंदने वर्चस्व मिळविले. हत्ती व दोन्ही उंटांच्या एंडगेमवर पोहोचल्यावर प्रज्ञानंदने डावावर पूर्ण नियंत्रण मिळविले. नंतर त्याने आरामात विजय मिळविला आणि असे आणखी विजय मिळविण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
सर्वात तरुण विश्वविजेता डी गुकेशला मात्र रोमानियाच्या डीक बोग्डन डॅनियलविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्याचा हा सलग दुसरा अनिर्णीत सामना आहे. पांढऱ्या मोहरांनी खेळताना गुकेशने सर्व ते प्रयत्न केला. पण डॅनियलने भक्कम बचाव करीत त्याला वर्चस्व मिळवू दिले नाही. शेवटी हा डाव अनिर्णीत राहिला.









