वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये शनिवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 3:14 च्या सुमारास किश्तवाड परिसरातील लोक भूकंपाच्या हादऱ्यांमुळे घराबाहेर पडले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार याची तीव्रता 2.7 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. भूकंपाचे केंद्र किश्तवाडमध्येच असून पाच किलोमीटर खोलीवर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. किश्तवाड आणि काश्मीर खोऱ्याचा बहुतांश भाग भूकंपीय झोन 5 मध्ये येतो. हा भाग अतिशय धोकादायक क्षेत्र मानले जाते. या भागात तीव्र भूकंप होण्याची शक्यता जास्त आहे. गेल्या पंधरवड्यात काश्मीरमध्ये चारवेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत.









