दिल्लीत शनिवारी 60 उड्डाणे रद्द : भारत-पाकमधील तणावाचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीमावर्ती भागात वाढत्या तणावामुळे हवाई प्रवास मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा विशेषत: उत्तर आणि पश्चिम भारतावर परिणाम झाला. गेल्या 2 दिवसांत परिस्थिती आणखी बिकट झाल्यामुळे प्रत्युत्तरात्मक कारवाई केल्याने सुरक्षेबाबत सतर्कता राखण्यात आली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना अपडेट्ससाठी त्यांच्या एअरलाईन्सशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दिल्ली विमानतळावर शनिवारी देशांतर्गत 60 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. दिल्ली विमानतळावरून निघणारी 30 देशांतर्गत उ•ाणे आणि दिल्ली विमानतळावर येणारी 30 देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली. तसेच दिल्ली विमानतळावर येणारे किंवा जाणारे कोणतेही आंतरराष्ट्रीय विमान रद्द केलेले नाही, असेही सांगण्यात आले.
दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये सध्या दिल्ली विमानतळाचे कामकाज सामान्य असल्याचे म्हटले आहे. तथापि, बदलत्या हवाई परिस्थिती आणि वाढीव सुरक्षा उपायांमुळे काही उ•ाण वेळापत्रकांवर परिणाम होऊ शकतो आणि सुरक्षा तपासणी प्रक्रियेला जास्त वेळ लागू शकतो, असे नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या आदेशानुसार म्हटले आहे.
विमानोड्डाणांबाबत अधिक व सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी प्रवाशांना एअरलाईन्सशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हातातील सामान आणि चेक-इन सामानासाठी नियमांचे पालन करा. सुरक्षा तपासणीत होणाऱ्या संभाव्य विलंबाची काळजी घेण्यासाठी विमानतळावर वेळेपूर्वी दाखल व्हा. सुरक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी विमान कंपनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. तुमच्या एअरलाईन किंवा दिल्ली विमानतळाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे फ्लाइटची स्थिती तपासा. अचूक माहितीसाठी अधिकृत स्त्राsतांवर विश्वास ठेवावा आणि अर्धवट माहिती शेअर करणे टाळावे, अशा बऱ्याच सूचना प्रवाशांना देण्यात आल्या आहेत.









