अधिकारी कर्मचारी आपले ऐकत नाहीत अशी कुजबुज कार्यकर्ते करत होते
कवठेमहांकाळ : तब्बल तीन वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधीना कायद्यानेच अटकाव केला होता. मात्र मंगळवारी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि राज्यसरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिल्याने राज्यातील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. कधी एकदा निवडणुका जाहीर होतील याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
खरे तर कवठेमहांकाळ तालुक्यात आजही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुक झाली तर आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी चारही जिल्हा परिषद मतदार संघात जोरदार मसुंडी मारेल असे बोलले जात आहे. तीन वर्षापूर्वी राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांच्या कालखंडात आरक्षण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे महायुतीचे सरकार आले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकाना खो बसला.
ओबीसी आरक्षणाचे घोंगडे भिजत पडले होते त्यामुळे लोकशाहीत तब्बल तीन वर्षे निवडणुकांना फटका बसला. लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाण्यापासून वंचित राहिले. राज्यातील सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद असो की महापालिका तब्बल तीन आमदार रोहित पाटील सुरेश पाटील बर्षे निवडणुका कधी होणार आणि सुप्रीम कोर्टाचा काय निकाल लागणार याकडे लक्ष लागून राहिले होते.
मंगळवारी ६ तारखेला दुपारी स्थानिक संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, असा आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि राज्यसरकारला दिला. राज्यातील सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आणि निवडणुकीचा मार्ग रिकामा झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. निवडणुका कधीही होवो आपण तयारीला लागूया अशा मनस्थितीत कार्यकर्ते आहेत.
गेली तीन वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकराज होते. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रशासनातील अधिकारी कवडीचीही किंमत देत नव्हते हम करे सो कायदा होता. अधिकारी कर्मचारी आपले ऐकत नाहीत अशी कुजबुज कार्यकर्ते करत होते. स्थानिक संस्थांच्या निवडणुका होऊद्या मग बघू असा इशाराही कार्यकर्ते मनात देत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहेतच आता फक्त अक्षतांची तारीख ठरायची आहे. मात्र कार्यकर्ते आत्तापासूनच निवडणुकांची लगीनघाई करीत आहेत. कवठेमहांकाळ
तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (एस पी ), काँग्रेस, शिवसेना ( ठाकरे गट) आणि त्यांचे मित्र पक्ष विरुद्ध महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप, शिवसेना (शिंदे गट) असा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सामना होणार आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात देशिंग, रांजणी, ढालगाव आणि कुची हे चार जिल्हा परिषद मतदारसंघ तर देशिंग मळणगाव, रांजणी हिंगणगाव कुची कोकळे, नागज आणि ढालगाव असे आठ पंचायत समितीचे गट आहेत.
२०२२ साली देशिंग आणि रांजणी अनुसूचित जाती, कुची ओबीसी महिला आणि ढालगाव सर्वसाधारण असे हे चार जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. या चारही जिल्हा परिषद मतदारसंघावर आ. रोहित पाटील यांचीच मजबूत पकड आहे. एक वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या पेक्षा विद्यमान खा. विशाल पाटील आघाडीवर होते. आठ महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा
आमदार रोहित पाटील जि. म. बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील, महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे, काँग्रेसचे संजय हजारे, धनाजी पाटील, रावसाहेब शिंदे, माणिक भोसले, दादासाहेब ढेरे, शिवसेनेचे मारुती पवार, अनिल बाबर अशी कार्यकर्त्यांची आघाडीकडे फौज आहे.
माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी खासदार संजय पाटील, राष्ट्रबादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अरुण भोसले, भाजप चे तालुकाध्यक्ष उदय भोसले, जेष्ठ नेते मिलिंद कोरे, नगराध्यक्ष रणजित घाटगे हे महायुतीचे दिग्गज कार्यकर्ते आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी आत्तापासूनच आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावून आपापल्या मतदारसंघात चाचपणी करत आहेत.








