वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सनरायझर्स हैदराबादने अष्टपैलू हर्ष दुबेला आपल्या संघात सामावून घेतले आहे. जखमी झालेल्या स्मरण रविचंद्रनच्या जागी त्याला आयपीएलच्या उर्वरित भागासाठी घेण्यात आले आहे.
देशी क्रिकेटमध्ये हर्ष दुबे विदर्भचे प्रतिनिधित्व करतो. त्याला सनरायझर्सने 30 लाखाला संघात घेतले आहे. 22 वर्षीय दुबेने आतापर्यंत 16 टी-20 व 20 लिस्ट ए सामने 18 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांत मिळून त्याने 127 बळी व 941 धावा जमविल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीस रणजी करंडक स्पर्धेत दमदार प्रदर्शन केल्यामुळे त्याला स्पर्धावीरचा पुरस्कार मिळाला. होता. त्याने 476 धावा व 69 बळी मिळविले. कर्नाटकचा 21 वर्षीय स्मरण याला गेल्या महिन्यात जखमी अॅडम झाम्पाच्या जागी सनरायझर्सने करारबद्ध केले होते.









