वृत्तसंस्था/ लिमा, पेरू
भारताचा वेटलिफ्टर पर्व चौधरीने येथे सुरू असलेल्या आयडब्ल्यूएफ युवा व कनिष्ठांच्या विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले. युवा मुलांच्या 96 किलो वजन गटात पर्वने एकूण 315 किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये 140 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 175 किलो वजन उचलले. भारताचे या स्पर्धेतील हे तिसरे पदक आहे. याआधी जोश्ना साबरने महिलांच्या 40 किलो वजन गटात तर हर्षवर्धने साहूने पुरुषांच्या 49 किलो वजन गटात कांस्यपदके मिळविली आहेत. ऑलिम्पिकप्रमाणे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये स्नॅच, क्लीन व जर्क तसेच एकंदरमध्ये वेगवेगळी पदके दिली जातात.









