कट्टा / वार्ताहर
काश्मीर पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात हिंदू धर्माच्या बांधवांची गोळ्या घालून अमानुष हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत क्रूर असून चिड येण्यासारखी असल्याने त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील सकल हिंदू समाज कट्टा दशक्रोशी संघ यांच्यावतीने काळया फित लावून ओम गणेश साई मंगल हॉल ते पोलीस दुरक्षेत्र कट्टा पर्यंत जाहीर मूकमोर्चा काढण्यात आला. यानंतर पोलिस दुरक्षेत्र कट्टा येथे दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी काही हिंदू बांधवांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी दशक्रोशीतील वकील, डॉक्टर, व्यापारी, शिक्षक, राजकीय व्यक्ती, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील हिंदू समाज बांधव उपस्थित होते.









