चंदीगड :
कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्याची धमकी दिली आहे. या टोळीची धमकीशी निगडित सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. पहलगाम हल्ल्यात निर्दोष लोकांच्या हत्येला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही पाकिस्तानात घुसून एका अशा व्यक्तीला ठार करू, जो एक लाख लोकांसमान असेल असे म्हटले गेले आहे. पोस्टमध्ये लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा फोटो आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. परंतु ही सोशल मीडिया पोस्ट कितपत खरी आहे आणि बिश्नोई टोळीनेच ती पोस्ट केली आहे का याची पुष्टी होऊ शकलेली नाही.









