बेळगाव : संगणक युगात अनेक खेळाडू मोबाईलच्या आहारी जात आहेत. जर खेळाडूंनी सातत्याने सराव केल्यास यश नक्कीच मिळेल.यासाठी नियमीत सराव गरजेचे असून तुमच्या यशाची तीच गुरुकिल्ली ठरेल, असे प्रतिपादन लेफ्टनंट कर्नल दलजीत सिंग यांनी केले. श्री वीरभद्रेश्वर कल्याण मंडप येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गणेश वंदन व स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे डॉ. अजित कुलकर्णी, ज्युनियर लीडर्स विंग कॅम्प बेळगाव लेफ्टनंट कर्नल दलजीत सिंग, डीवायएसपी लोकायुक्त बेळगाव बी. एस. पाटील, संजीव तोपिनकट्टी, अध्यक्ष एल. जी. कोळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सुरेश भातकांडे, पंडित ओगले, ज्योती कोलेकर ,धनंजय होंगल, विश्वंभर कोलेकर, बसवराज कडली, महादेव पाटील, गोविंद टक्केकर, श्रीराम नाईक, माजी बाबुराव मेलगे, अनिल गोरे, राजू जाधव, निरंजन कर्लेकर, मुख्याध्यापक सातेरी वड्डेबलकर यासह आदींचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूल शिक्षक डी. एन. गुरव यांनी केले. अहवाल वाचन शिक्षिका उज्वला गोरे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या श्रुती निलजकर, भूषण गुरव, नंदिष कित्तूर, वेदांत रेडकर, तनिष्क पाटील, आकाश पाटील स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला क्लबचे संचालक मंडळ, खेळाडू, पालक वर्ग हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









