यू-20 एएफसी महिला आशिया चषक पात्रता स्पर्धा लोगो
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एएफसी 20 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या आशिया चषक पात्रफेरीच्या फुटबॉल स्पर्धेसाठी कौलालंपूर येथे काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये भारतीय महिला फुटबॉल संघाचा ड गटात समावेश झाला आहे.
सदर स्पर्धा म्यानमारमध्ये होणार आहे. ही पात्र फेरीची स्पर्धा 6 ते 10 ऑगस्ट दरम्यान खेळविली जाईल. ड गटामध्ये भारत, यजमान म्यानमार, इंडोनेशिया आणि तुर्की यांचा समावेश आहे. सदर स्पर्धा सिंगल राऊंडरॉबीन पद्धतीने खेळविली जाणार आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण 33 संघांचा समावेश असून ते आठ गटात विभागण्यात आले आहेत. गट अ मध्ये 5 संघाचा समावेश असून उर्वरित गटामध्ये प्रत्येकी 4 संघ राहतील. बारावी एएफसी 20 वर्षांखालील वयोगटाची महिलांची आशिया चषक फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षीच्या 1 ते 18 एप्रिल दरम्यान होणार असून या स्पर्धेत एकूण 12 संघाचा समावेश राहिल.









