वृत्तसंस्था/ सेव्हेली
कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद बार्सिलोना क्लबने पटकाविले. या स्पर्धेतील झालेल्या चुरशीच्याअंतिम सामन्यात बार्सिलोनाने रियअल माद्रीदचा जादावेळेच्या कालावधीत 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यातील बार्सिलोनाचा निर्णायक गोल ज्युलेस कॉन्डेने नोंदविला.
हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत राहिले. त्यानंतर जादा कालावधीचा अवलंब करण्यात आला. सामन्यातील 116 व्या मिनिटाला बचाव फळीत खेळणाऱ्या ज्युलेस कॉन्डीने लुकाम मोड्रीकने दिलेल्या पासवर निर्णायक गोल नोंदविला. बार्सिलोनाने कोपा डेल रे फुटबॉल चषकावर विक्रमी 32 वेळा आपले नाव कोरले आहे.
हा अंतिम सामना सुरू झाल्यानंतर 28 व्या मिनिटाला पेद्री गोंझालेजने बार्सिलोनाचे खाते उघडले. सामन्याच्या उत्तराधार्थ माद्रीदने दोन गोल केले. 70 व्या मिनिटाला रियल माद्रीद संघातील एम्बापेने माद्रीचा पहिला गोल तर 77 व्या मिनिटाला चोमेनीने हेडरद्वारे माद्रीदचा दुसरा गोल केल्याने रियल माद्रीदने बार्सिलोनावर 2-1 अशी आघाडी मिळविली. सामना संपण्यास 6 मिनिटे बाकी असताना म्हणजे 84 व्या मिनिटाला फेराम टोरेस्टने रियल माद्रीदच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत बार्सिलोनाचा दुसरा गोल केल्याने निर्धारित 90 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत राहिले होते. त्यानंतर जादा कालावधीत कॉन्डेने बार्सिलोनाला निर्णायक गोलावर जेतेपद मिळवून दिले. या सामन्यानंतर किंग फिलीपी यांच्या हस्ते बार्सिलोनाचा कर्णधार रोनाल्ड अॅरुजोने आकर्षक चषक स्वीकारला.









