वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने दीर्घ पल्ल्याच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या विकासांच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत महत्त्वाचे परीक्षण केले आहे. स्क्रॅमजेट इंजिनच्या अॅक्टिव्ह कूल्ड कम्बस्टरचे जमिनीवर 100 सेकंदांपर्यंत यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. हे इंजिन क्षेपणास्त्रांना अत्यंत वेगाने लक्ष्य गाठण्यास मदत करणार आहे. हायपरसोनिक क्षेपणास्त्र ध्वनिपेक्षा 5 पट अधिक वेगवान आहे. डीआरडीओच्या हैदराबाद येथील संरक्षण संशोधन तसेच विकास प्रयोगशाळेने (डीआरडीएल) हायपरसोनिक अस्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य केली आहे.
भारताने अॅक्टिव्ह कूल्ड स्क्रॅमजेट तंत्रज्ञानासोबत हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान देखील केवळ निवडक देशांकडेच आहे. या यशस्वी परीक्षणासह भारताने अत्यंत वेगवान क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.









