नवीन रोजगार निर्माण होणार असल्याचे संकेत
नवी दिल्ली :
दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स तामिळनाडूमधील त्यांच्या श्रीपेरंबुदुर प्रकल्पामध्ये 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती तामिळनाडू राज्याचे उद्योगमंत्री टीआरबी राजा यांनी दिली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा काही महिन्यांपूर्वी त्याच सॅमसंग प्रकल्पामध्ये कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली होती. फेब्रुवारीमध्ये धरणे आंदोलन झाले होते, जे सहा महिन्यांतील दुसरे सर्वात मोठे कामगार वाद होते. सप्टेंबर 2024 मध्ये, सॅमसंगच्या श्रीपेरंबुदूर युनिटमधील शेकडो कर्मचाऱ्यांनी पगारवाढ आणि युनियनला मान्यता मिळावी या मागणीसाठी पाच आठवडे संप केला. त्या संपानंतर, कंपनीने कामगारांच्या अनेक मागण्या पूर्ण करण्यास सहमती दर्शविली
श्रीपेरंबुदूर युनिटमध्ये निदर्शने
श्रीपेरंबुदूर युनिटमध्ये कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात अनेक संघर्ष झाले आहेत, कर्मचाऱ्यांनी कंपनीवर युनियनविरोधी रणनीती अवलंबल्याचा आरोप केला आहे. सॅमसंगने आरोप फेटाळून लावले आहेत, ते म्हणाले आहेत की, ते सर्व लागू कायद्यांचे पालन करते. फेब्रुवारीमध्ये, कांचीपुरम जिह्यातील एका उत्पादन युनिटमध्ये कारखान्यातील कामगारांनी एक दिवसाचे उपोषण करण्याची धमकी दिल्याने गोंधळ आणखी वाढला..









