न्हावेली / वार्ताहर
सिद्धिविनायक कला क्रीडा व महिला मंडळ शितलवाडी, पाडलोस यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 25 व 26 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 25 रोजी सकाळी 10 वा. प्रतिमेचे पूजन व बुद्धवंदना, 10.30 वा. स्वागत व परिचय, 10.45 वा. स्वागत गीत, 11 वा. मान्यवरांची भाषणे, दुपारी 12 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक, दुपारी 2.30 ते संध्या. 6.30 वाजेपर्यंत महिलांचे व मुलांचे विविध खेळ, तसेच रात्री 9 वा. बापू गोपाळ गुंडू लिखित दोन अंकी मालवणी विनोदी नाटक ‘सोडला तर पळता’ सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुरज साठे व पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर उपस्थित राहणार आहेत. शनिवार 26 रोजी रात्री 8 वा. जल्लोष भिमाचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सिद्धिविनायक कला क्रीडा व महिला मंडळ शितलवाडी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
Previous ArticleKolhapur Football: फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी; समर्थक एकमेकांत भिडले
Next Article ओटवणेत काका दामले यांचे शैक्षणिक कार्य संस्मरणीय









