वार्ताहर/येळ्ळूर
सालाबादप्रमाणे याहीवर्षी गुरुवार दि. 24 रोजी कलमेश्वर व श्री चांगळेश्वरी यात्रा आणि महालक्ष्मी वाढदिवसानिमित्त येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. या मैदानात चटकदार 80 कुस्त्या होणार असून भारतातील नामवंत मल्लांची हजेरी असणार आहे. महान भारत केसरी शेरा विरुद्ध आंतरराष्ट्री दर्जाचा मल्ल मिर्झा इराण, रुस्तम-ए-हिंद महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध जम्मू भारत केसरी अमित बनिया, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल-पुणेचा रवी चव्हाण वि. हरियाणा भारत केसरी रोहीत सम्चमिया आणि युपी केसरी हरियाणा राजू मलंगा वि. डबल कर्नाटक केसयरी दाणगेरीचा कार्तिक काटे या तुल्यबळ कुसत्या होणार आहेत. कुस्ती शौकिनांची गर्दी बघता कुस्ती मैदानाची व आखाड्याच्या साफसपाई व सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले असून आखाडा कुस्त्यासाठी सज्ज आहे. यासाठी दोन ते तीन दिवस यल्लप्पा पाटील, श्रीधर कानसिडे, दीपक कर्लेकर, प्र्रल्हाद पाटील, निरंजन कर्लेकर व महाराष्ट्र मैदान येळ्ळूरचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.









