संगमेश बिराजदार-बाळू अपराध यांच्यात प्रमुख लढत
बेळगाव : संतीबस्तवाड येथे बसवेश्वर व श्री दुर्गादेवी यात्रेनिमित्त संतीबस्तवाड येथे बुधवारी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानात प्रमुख कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराध यांच्यात होईल. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक दसरा केसरी शिवय्या पुजेरी व सांगलीचा अक्षय भोसले, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती सांगलीचा इंद्रजित शेळके वि. कर्नाटक चॅम्पियन पार्थ पाटील, चौथ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन प्रथमेश हट्टीकर-कंग्राळी वि. राष्ट्रीय चॅम्पियन भिमाशी काटे, पाचव्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन महेश बिर्जे वि. राजू डागेकर-राशिवडे, सहाव्या क्रमांकाची कुस्ती पंकज चापगाव वि. सुमित कडोली, सातव्या क्रमांकाची कुस्ती संभाजी-काकती व दयानंद शिरगाव, आठव्या क्रमांकाची कुस्ती प्रविण निलजी वि. विनायक येळ्ळूर, नवव्या क्रमांकाची कुस्ती रामदास काकती वि. सुरज कडोली, दहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रल्हाद मुंचडी व सिद्धार्थ-तीर्थपुंडये यांच्यात होणार आहे. या शिवाय लहान मोठ्या 50 हून अधिक कुस्त्या आयोजित केल्या आहेत. आकर्षक कुस्ती प्रज्वल मच्छे व करण खादरवाडी, मंजुनाथ संतीबस्तवाड व श्रेयस कटांबले-खादरवाडी यांच्यात होणार आहे.









