वार्ताहर/सांबरा
बसवण कुडची येथे झालेल्या हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत साईराम क्रिकेट संघाने विजेतेपद पटकाविले. सदर स्पर्धा गजानन तरुण युवक मंडळाने आयोजित केली होती. या स्पर्धेत 14 संघांनी आपला सहभाग दर्शविला. चुरशीच्या अंतिम सामन्यात सुदर्शन बी. संघाने 4 षटकात 33 धावा केल्या. त्यानंतर साईराम क्रिकेट संघाने हा सामना जिंकून जी. टी. एम. चषक पटकाविला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक साईराम स्पोर्ट्स विजेता तर सुदर्शन बी. उपविजेता ठरला. सुदर्शन ए. संघाने तिसरे स्थान पटकावले. यल्लाप्पा दिवटे उत्कृष्ट गोलंदाज, संजय चौगुले उत्कृष्ट फलंदाज, लकी मुचंडीकर मालिकावीर ठरला. या सर्वांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी निळकंठस्वामी हिरेमठ, बाबू बेडका, परशराम बेडका, सुनील घसारी, किसन दिवटे, आकाश अनगोळकर, कलमेश खंडोचे, यल्लाप्पा हलगेकर, हरी बेडका, योगेश अनगोळकर, परशराम अनगोळकर अविनाश बेडका व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे समलोचन राजू चौगुले व महेश इटगेकर यांनी केले.









