वृत्तसंस्था/ लखनौ
आयपीएलच्या आज मंगळवारी येथे होणाऱ्या सामन्यात आत्मविश्वास वाढलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सला करावा लागणार असून यावेळी दिल्लीला सलामीवीरांकडून अधिक उत्पादक प्रयत्नांची अपेक्षा असेल. या हंगामात कॅपिटल्सची सुऊवात थोडीशी रंजक राहिली आहे. फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल आणि नव्याने प्रवेश केलेला कऊण नायर हे सलामीला आलेले आहेत.
खरे तर गेल्या पाच सामन्यांमध्ये त्या चार फलंदाजांच्या दरम्यान सलामीवीरांच्या तीन वेगवेगळ्या जोड्या पाहायला मिळाल्या आहेत आणि 23, 34 0, 9, 0 अशी त्यांची भागीदारी झालेली आहे. डू प्लेसिसची दुखापत देखील यास कारणीभूत आहे आणि आजच्या सामन्यापूर्वी या दक्षिण आफ्रिकी खेळाडूच्या तंदुऊस्तीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. कॅपिटल्सने त्यांचे सातपैकी पाच सामने जिंकले आहेत आणि के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील मधल्या फळीनेही चांगली कामगिरी केली आहे. परंतु लखनौच्या दिग्वेश राठी, रवी बिश्नोई, आवेश खान आणि शार्दुल ठाकूर या सक्षम गोलंदाजी विभागाने, जरी ते थोडे महागडे ठरलेले असले, तरी फारसा गाजावाजा न करता विरोधी संघाच्या आव्हानाला उद्धवस्त केलेले आहे.
एलएसजीच्या दोन धावांच्या विजयात आवेशने 18 व्या आणि 20 व्या षटकात राजस्थान रॉयल्सविऊद्ध ज्या प्रकारे उत्कृष्ट कामगिरी केली ते त्याचे एक उदाहरण आहे. यामुळे सुपर जायंट्सचा कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवू शकण्याचा आत्मविश्वासही दुप्पट झाला असेल. म्हणूनच, कॅपिटल्सला यावेळी डाव उभारण्याचे काम राहुल आणि त्याच्या मधल्या फळीतील सहकाऱ्यांवर न सोडता सलामीच्या जोडीने घालून दिलेल्या भक्कम पायावर मधल्या फळीने केलेली उभारणी पाहणे आवडेल. दुसरीकडे, लखनौ संघाकडे मजबूत वरची फळी असून त्यातील मिशेल मार्श, निकोलस पूरन आणि एडेन मार्करम यांनी अनेकदा चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे पॉवर प्लेच्या टप्प्यात त्यांचे पारडे भारी ठरलेले आहे.
दिल्ली आणि एलएसजी कर्णधारांचा वैयक्तिक फॉर्म मात्र त्यांच्या संघांच्या नशिबाच्या अगदी विपरित आहे. दोन्ही संघांचे 10 गुण झालेले आहेत आणि आणखी एक विजय त्यांना गुणतालिकेच्या शिखरावर सुरक्षितपणे ठेवेल. परंतु कर्णधार रिषभ पंतचा फॉर्म ही एलएसजीसाठी एक मोठी समस्या आहे. त्याने आठ सामन्यांत फक्त 106 धावा केल्या आहेत आणि त्यापैकी 63 धावा एकाच सामन्यात झालेल्या आहेत. त्याचा 98 चा स्ट्राईक-रेट देखील थोडा चिंताजनक आहे. दिल्लीविऊद्ध पंतला मिशेल स्टार्क, कुलदीप यादव, विप्रज निगम आणि मुकेश कुमार यांच्यासारख्या उत्कृष्ट गोलंदाजांचा सामना करावा लागेल.
एलएसजीप्रमाणेच दिल्ली संघालाही कर्णधार अक्षर पटेलबद्दल काही चिंता असतील. अक्षरने चांगले नेतृत्व केले आहे आणि 159 च्या स्ट्राईक-रेटने 140 धावा जमविल्या आहेत, परंतु गोलंदाजीत तो प्रभावी ठरलेला नाही. 9.36 च्या इकोनॉमी रेटने त्याने गोलंदाजी केलेली असून सात सामन्यांमधून फक्त एक बळी त्याला मिळविता आलेला आहे. असे दिसते की, संघाचे नेतृत्व करण्याची अतिरिक्त जबाबदारी आणि वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची मागणी यामुळे अक्षरला त्याच्या प्राथमिक कौशल्यांकडे दुर्लक्ष करावे लागले आहे.
संघ-लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, डेव्हिड मिलर, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, दिग्वेश सिंह राठी, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद, मॅथ्यू ब्रेट्झके, हिम्मत सिंग, शामर जोसेफ, मणिमरन सिद्धार्थ, आर्यन जुयाल, आर. एस. हंगरगेकर, युवराज चौधरी, आकाश महाराज सिंग, मयंक यादव, अर्शिन कुलकर्णी.
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, कऊण नायर, के. एल. राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, दर्शन नळकांडे, डोनोवन फेरेरा, त्रिपुराना विजय, दुष्मंथा चमीरा, फाफ डू प्लेसिस, टी नटराजन, अजय जाधव मंडल, मानवंथ कुमार एल., माधव तिवारी.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.









