वृत्तसंस्था/ मुंबई
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 8500 कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय शेअरबाजारात केली आहे. कमी कालावधीच्या आठवड्यामध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 18 एप्रिलच्या संपलेल्या कालावधीत 8472 कोटी रुपये बाजारात गुंतवले आहेत.
देशाची स्थिर आर्थिक परिस्थिती यामुळे गुंतवणूक चांगली दिसून आली आहे. सदरच्या आठवड्यामध्ये 15 एप्रिल रोजी 2352 कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत तर याच तुलनेमध्ये नंतरच्या दोन दिवसांमध्ये 10,824 कोटी रुपयांची गुंतवणूकही करण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात 15 ते 17 एप्रिल असे तीनच दिवस शेअर बाजाराचे कामकाज झाले होते. सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आणि शुक्रवारी गुड फ्रायडे निमित्त शेअर बाजार बंद होता. एप्रिलमध्ये आत्तापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 23 हजार 103 कोटी रुपये काढून घेतले आहेत.









