सावंतवाडी । प्रतिनिधी
महाराष्ट्र वुमन्स प्रीमियर लीग मध्ये रत्नागिरी जेट्स स्कॉड संघातून इन्सुली येथील जान्हवी राकेश बोकाडे हिची निवड झाली आहे. अलीकडे महाराष्ट्र वुमन्स प्रीमियर लीग साठी खेळाडूंचा लिलाव झाला. त्यात रत्नागिरी जेटस् स्कॉड संघाने बोकाडे हिची आपल्या संघातून निवड केली आहे . बोकाडे ही उत्कृष्ट गोलंदाज आहे. इन्सुली येथील एस आर आय क्रिकेट अकादमी मधून ती प्रशिक्षण घेत असून भारत गरुडकर हे तिचे प्रशिक्षक आहेत. इन्सुली सारख्या ग्रामीण भागातून क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या या खेळाडूचे अभिनंदन होत आहे. रत्नागिरी जेट्स स्कॉड संघाची कप्तान स्मृती मानधना असून तिने भारतीय संघाचे कप्तान पदही भूषवले आहे.









