वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय संघाचा फलंदाज प्रशिक्षक अभिषेक नायर याची बीसीसीआयने हकालपट्टी केल्यानंतर त्याला पुन्हा कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघातील प्रशिक्षकवर्गामध्ये दाखल करुन घेतले आहे.
चालु वर्षाच्या प्रारंभी झालेल्या बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निकृष्ट झाली होती. यानंतर बीसीसीआयने अभिषेक नायरसह अन्य तीन प्रशिक्षकांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला होता. केकेआरचा तत्कालीन प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरसमवेत अभिषेक नायरने प्रशिक्षकाची धुरा सांभाळली होती. केकेआरच्या फ्रांचायझीनी अभिषेक नायरचे स्वागत केले आहे.









