वृत्तसंस्था / मुर्शिदाबाद
राष्ट्रीय महिला आयोगाने शनिवारी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील दंगलग्रस्त हिंदू महिलांची भेट घेतली आहे. या महिलांनी त्यांच्यावर ओढविलेली भीषण परिस्थिती महिला आयोगाच्या अध्यक्षांना कथन केली. आपल्यावर दंगलखोरांनी केलेल्या अत्याचारांची माहिती देत असताना या महिलांना दु:ख आणि अश्रू अनावर झाले होते. अक्षरश: रडत त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे आणि अत्याचारांचे सत्यकथन महिला आयोगासमोर केले. मुर्शिदाबाद येथे वक्फ कायद्याविरोधात मुस्लीमांनी केलेल्या हिंसक आंदोलनाची झळ या महिलांना बसली आहे. त्यांची भेट घेण्यासाठी महिला आयोग तेथे गेला आहे.









