विविध कार्यक्रमांचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
सांगेली गावचे ग्रामदैवत श्री गिरीजानाथ देवस्थान पंचायतन मधील श्री देव रवळनाथ मंदिराचा संप्रोक्षण विधी रविवारी २० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त रवळनाथ मंदिरात सकाळी ८ वाजता मानकऱ्यांकडून गणपतीपूजन संभारदान घेणे कार्यक्रम, सकाळी ८.१५ वाजल्यापासून पुण्याहवाचन, देवतास्थापन पूजन, अग्निस्थापन, हवन, बलिदान, पुर्णाहुती, वास्तू स्थापना आदी धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वाजता कलशारोहण, दुपारी १.३० वाजता आरती, तिर्थप्रसाद त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. रात्रौ ९ वाजता श्री विठ्ठलादेवी दशावतार नाट्यमंडळ (राठीवडे) यांचा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गिरिजानाथ देवस्थानचे मानकरी आणि सांगेली ग्रामस्थांनी केले आहे.









