अगसगे गावच्या खेळाडूची नेत्रदीपक कामगिरी
वार्ताहर/अगसगे
इंडोनेशिया येथे होणाऱ्या 15 वर्षांखालील आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगावच्या श्रेयस पाटीलची निवड झाली आहे. या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक होत आहे. श्रेयस हा अगसगे (ता. बेळगाव) येथील मुळचा रहिवासी असून सध्या तो बेंगळूर येथे शिक्षणाबरोबरच फुटबॉलचे धडे गिरवत आहे. यापूर्वीही त्याने 15 वर्षांखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधीत्व करताना कर्णधार म्हणून कार्य केले होते. इयत्ता पाचवीत असताना बेंगळूर फुटबॉल क्लबसाठी त्याची निवड झाली होती. त्यानंतर त्याने दहावीपर्यंत क्लबतर्फे शाळेतून फुटबॉलचे धडे गिरविले. कर्नाटक राज्य फुटबॉल स्पर्धेसाठी त्याने उत्तम कामगिरी केली आहे. त्याला शिक्षकांचे मार्गदर्शन तर आई, वडील, काका, काकी यांचे प्रोत्साहन लाभत आहे. श्रेयसच्या कामगिरीमुळे अगसगे गावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.









