बेळगाव : साधना क्रीडा संघ आयोजित राज्यस्तरीय प्रकाश झोतातील मॅटवरील खो खो स्पर्धेत पहिल्या दिवशी साधना-बेळगाव, अल्वाझ, डीएससी दावणगेरी, बेंगळूर, के.के.ओ. कुट्यानहळ्ळी, वायपीएससी बेंगळूर, एफआरए शिमोगा संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजयी सलामी दिली. बेळगावात प्रथमच मॅटवरील खो-खो स्पर्धांचे आयोजन साधना क्रीडा केंद्रातर्फे करण्यात आले आहे. वडगाव येथील जेलस्कूल मैदानावरती या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मॅट व जमिनीवरती साखळी सामने खेळविले जात आहेत. शुक्रवार सायंकाळी सुरुवात करण्यात आली. स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धा साखळी व बाद अशा दोन्ही प्रकारांमध्ये घेण्यात येणार आहे. खो-खो मैदानाचे पूजन प्राचार्य शिंगणावर यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील दोन दिवस सदर स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. सदर स्पर्धा मॅटवर खेळविण्यात येणार आहेत. तेव्हा बेळगाव व परिसरातील क्रीडा क्रीडा प्रेमीनी आंतरराष्ट्रीय खेळाचा आनंद घ्यावा असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्ष संजय बेळगावकर, प्रकाश नंदीहळळी, शिवानंद कोरे, अनिल कोरे, पी. ओ. धामणेकर, अशोक हलगेकर, विवेक पाटील, अरुण धामणेकर, सतीश बाचीकर, शेखर चोळापाचे, उमेश मजुकर, उमेश पाटील, सी. एम. गोरल, यांच्यासह कर्नाटकातील नामवंत पंच व खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेतील पहिला साखळी सामना अल्वाज एस. सी. मुडबिद्री व केकेसी कोलार यांच्यात झाला. या सामन्यात अल्वाजने 8 गुणांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या सामन्यात एम. व्ही. भद्रावती व डीएससी दावणगेरी यांच्यातील सामन्यात 2 गुणांनी दावणगेरीने हा सामना जिंकला. तिसरा सामना बेंगळूर पायोनियर्स वि. एएससी चलकेरी यांच्यात झाला. यात बेंगळूरने 15 गुणांनी जिंकला. चौथ्या सामन्यात के.के.ओ. कुट्यानहळ्ळी वि. एनएससी कुनगोळ संघाचा 6 गुणांनी पराभव केला. पाचव्या सामन्यात वायपीएससी बेंगळूरने एससीवायसी गुब्बी संघाचा 14 गुणांनी, सहाव्या सामन्यात साधना क्रीडा केंद्र बेळगावने एमएससी नागनूरचा 10 गुणांनी, सातव्या सामन्यात एफआरए शिमोगाने केकेएससी कुरबर संघाचा 5 गुणांनी पराभव केला.









