वृत्तसंस्था / जेदाह
2025 च्या एफ-1 ग्रा प्रि मोटर रेसिंग हंगामातील येथे रविवारी सौदी अरेबियन ग्रा प्रि एफ-1 शर्यत आयोजित केली आहे. शनिवारी या शर्यतीचा सराव टप्पा होणार आहे. दरम्यान रेडबुल चालक आणि विद्यमान विजेता मॅक्स व्हर्स्टेपन तसेच मॅक्लेरीन चालक लॅन्डो नोरीस तसेच ऑस्कर पिसेट्री यांच्यात जेतेपदासाठी चुरस राहिल.
नोरीस आणि पिसेट्री यांनी गेल्या काही शर्यतींमध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे. गेल्या आठवड्यात पिसेट्रीने बहरीन ग्रा प्रि शर्यत जिंकली होती. चालु वर्षीच्या ग्रा प्रि हंगामामध्ये मॅक्लेरीन चालकाशिवाय ग्रा प्रि शर्यत जिंकणारा व्हर्स्टेपन हा एकमेव चालक आहे. मात्र बहरीन ग्रा प्रि शर्यतीमध्ये व्हर्स्टेपनला पिसेट्रीने मागे टाकले होते.









