वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग
लंकेत होणाऱ्या तिरंगी वनडे क्रिकेट मालिकेसाठी क्रिकेट द. आफ्रिकेने सोमवारी आपल्या संघाची घोषणा केली असून वूलव्हर्टकडे कर्णधारपद सोपविले आहे. या तिरंगी स्पर्धेत यजमान लंका, द. आफ्रिका आणि भारत यांचा समावेश आहे. सदर स्पर्धा 27 एप्रिलपासून सुरू होईल. स्पर्धेतील सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळविले जातील.
द. आफ्रिका संघ: वूलव्हर्ट (कर्णधार), बॉश्च, ब्रिट्स, डी. क्लर्क, डर्कसेन, जेफ्टा, खाका, क्लास, लुस, मेसो, मलाबा, एस. नायडू, शेनगेसी, स्मिट आणि ट्रायॉन









