बेंगळूर :
दिग्गज टेक कंपनी गुगलने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या प्लॅटफॉर्म अँड डिव्हाइसेस डिव्हिजन विभागातून अलीकडेच कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. हा विभाग अँड्रॉइड सॉफ्टवेअर, पिक्सेल स्मार्टफोन आणि क्रोम ब्राउझर सारख्या उत्पादनांचा व्यवसाय सांभाळते. पुनर्रचनेच्या कार्यक्रमांतर्गत कंपनीने ही कर्मचारी कपात केली असल्याचे सांगितले जात आहे. किती कर्मचारी कमी करण्यात आलेत हे कळालेले नाही.









