कोलकाता :
आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीमध्ये टाटा मोटर्स समूहाच्या घाऊक वाहन विक्रीमध्ये 3 टक्के इतकी घसरण दिसून आली आहे. 3 लाख 66 हजार 177 वाहनांची विक्री चौथ्या तिमाहीत टाटा मोटर्स समूहाने केली आहे.
यामध्ये लक्झरी ब्रँड जग्वार लँड रोव्हर या गाडीच्या विक्रीचाही समावेश आहे. सदरच्या तिमाहीत व्यावसायिक आणि प्रवासी वाहनांच्या मागणीमध्ये घट झाली आहे. चौथ्या तिमाहीत टाटा मोटर्सने 1 लाख 7 हजार 765 व्यावसायिक वाहनांची घाऊक विक्री केली आहे. मागच्या वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत विक्रीमध्ये 3 टक्के घसरण पाहायला मिळाली असून यामध्ये प्रवासी वाहनांचासुद्धा समावेश आहे.









