कुपवाड :
शहरातील रेणुका मंदिरात चोरी झाल्याची घटना गुऊवारी सकाळी उघडकीस आली. यामध्ये सुमारे शंभर वर्षापूर्वीची रेणुका देवीची मूर्ती, समई, स्वामी समर्थ देवाची मूर्ती, अशा पितळेच्या अन्य काही मूर्तीची चोरी झाली. याबाबत कुपवाड पोलिसात अद्याप नोंद नव्हती.
मिरज रस्त्यावर थोरला गणपती चौकात जुने रेणुका देवीचे मां†दर आहे. या मां†दरांची स्थापना 1923 पूर्वी झाली आहे. तीन वर्षांपूर्वी एकदा मां†दरात रेणुका देवीचे मंगळसूत्र चोरीला गेले होते. त्याचा सुगावा अद्याप लागला नाही. बुधवारी मध्यरात्री पूर्वी चोरट्यांनी दरवाजा उघडा असल्याची संधी साधून देवीची अंदाजे दीड ा†कलोची ा†पतळेची मूर्ती, बाळकृष्ण मूर्ती, शंकराची पिंड, गणपती मूर्ती अशा देवतांच्या मूर्तीची चोरी झाल्याचे देवस्थानचे संस्थापक सुधीर नाईक यांनी सांगितले.








