भाजप नेते अश्विनी चौबे यांची मागणी
पाटणा : भाजपमध्ये नाराज असलेले पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवरून नवा सूर आळवला. नितीश कुमारांना केंद्र सरकारमध्ये जबाबदारी देण्यात यावे. नितीश कुमार आणि मोदी यांची जोडी देशाला दिशा देत आहे. याचमुळे नितीश कुमारांना उपपंतप्रधान करण्यात यावे अशी बिहारची इच्छा असल्याचे चौबे यांनी म्हटले आहे. तर संजद नेते अभिषेक झा यांनी चौबे यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे. सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. चौबे यांनी स्वत:चे म्हणणे मांडले आहे, परंतु बिहारच्या जनतेला नितीश यांचा चेहराच पसंत आहे. नितीश कुमारांनी बिहारच्या जनतेची सेवा केली आहे. बिहार निवडणुकीत रालोआचे नेतृत्व नितीश कुमार हेच करणार असल्याचा दावा झा यांनी केला आहे.









