दापोली :
तालुक्यातील नवानगर–तांबडीकोंड येथील पंपहाऊसमधून पंप व इतर साहित्याची चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबतची फिर्याद ततीक्षा सुदर्शन गायकवाड यांनी दापोली पोलिसात दिली आहे.
पोलीसांकडून मिळलेल्या माहितीनुसार 4 एप्रिल सायंकाळी 6 ते 8 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजण्याच्या कालावधीत नवानगर–तांबडीकोंड येथील चोरट्याने फिर्यादीच्या मालकीच्या पंप हाऊसमध्ये ठेवलेले साहित्य दरवाजाची कडी वाकवून दरवाजा तोडून चोरुन नेले आहे. यामध्ये 48 हजार रुपयांचे कंपाउंड करण्यासाठी वापरण्यात येणारी तारेची 8 बंडल, 2 हजार रुपयांच्या पाण्याचा बोरींगचा स्टार्टर, 2400 रुपयांचे दोन पाण्याचे पाईप, दोन लोखंडी पहार, 1 हजार रुपयांच्या ए सीसी सिमेंटच्या 3 बॅगा, असे एकूण 53,600 ऊपयांचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.








