शालिनी पांडे मुख्य नायिका
अभिनेता पुलकित सम्राट आता ‘राहु केतु’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पुलकितने अलिकडेच सुरू केले आहे. या चित्रिकरणाशी निगडित काही छायाचित्रे त्याने शेअर केली आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत अनेक दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन विपुल विग करत आहेत. राहु केतु चित्रपटात पुलकित सम्राटला वरुण शर्मासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी दोघांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. याचबरोबर या चित्रपटात शालिनी पांडे नायिकेच्या भूमिकेत आहे.
राहु केतु चित्रपटासोबत पुलकित हा ग्लोरी नावाच्या चित्रपटातही काम करत आहे. या चित्रपटासाठी तो खूप दिवसांपासून मेहनत घेत आहे. सध्या तो बॉक्सिंगचा सराव करत आहे. ग्लोरी या चित्रपटात तो एका बॉक्सरची भूमिका साकारत आहे.









