वार्ताहर/जांबोटी
तरुण भारत सोसायटी संचलित जांबोटी येथील बाबुराव ठाकुर पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गेल्या मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातून सोनाली दत्ताराम गावडे हिने 84.67 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला. सानिका तानाजी घाडी हिने 83 टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक तर रोहिणी हणमंत देसाई हिने 81.33 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे. कला शाखेतून रसिका लक्ष्मण गावकर हिने 73.33 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला. संजना दशरथ गवसेकर हिने 72.83 टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक, तसेच शिवानी सातेरी गवशेकर हिने 69.83 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर, संचालक मंडळ, प्राचार्या तसेच प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.









