मालवण तालुक्यातील 65 ग्रामपंचायतसाठी झाली सोडत
मालवण/प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी प्रांताधिकारी ऐश्वर्या कोळुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार वर्षा झालटे आणि नायब तहसीलदार नागेश शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने सरपंच व इच्छुक उमेदवार उपस्थित होते.









