कोल्हापूर :
अंबाबाई मंदिराचा गेल्या तीनशे वर्षांपासून अविभाज्य घटक राहिलेला आणि सागवानी लाकडापासून साकारण्यात येत असलेला नवा नक्षीदार गरुड मंडप पूर्वीसारख्या स्वरुपात उभारणीच्या कामाला येत्या आठच दिवसात सुरुवात होत आहे. मंडप उभारणीसाठी एक चांगला मुहूर्त पाहण्यात येत आहे. आवश्यक ते सर्व विधी करुनच मंडप उभारणीला सुरुवात होईल. नुकतेच मंदिरात 10 लाकडी खांबही आणले आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून केली जाणारी प्रतिक्षा आता संपली आहे. सध्या मंडपाचा संपूर्ण डोलारा पेलणाऱ्या खांबांच्या उभारणीबरोबर त्यांना आधार देण्यासाठी मंडपाच्या जागेवर लोखंडी फ्रेम उभारल्या आहेत.
खांब उभारल्यानंतर टप्प्या–टप्प्याने जुलै महिन्यापर्यंत मंडप उभारणीचे काम करण्याची सुचना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने ठेकेदार ओसवाल कंस्ट्रक्शनला केली आहे. कंस्ट्रक्शननेही सुचनेनुसार काम पूर्ण करण्यास सहमती दर्शवली असल्याचे समितीच्या सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
प्राचिन काळापासून अंबाबाई मंदिरात उभारलेल्या सागवानी लाकडाचा नक्षीदार गरुड मंडपाचा छताचा भाग खचल्याचे आणि खांब सडल्याचे चार वर्षापूर्वी दिसून आले. मंडप केव्हाही कोसळले या भीती पोटी गतवर्षीच्या जानेवारी महिन्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने गऊड मंडप उतरुन घेऊन पूर्वी जसा होता, अगदी तसाच नवा मंडप उभारण्याचा निर्णय घेतला. समितीने केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक घेऊन शासनाच्या विधी व न्याय विभागाने लोकसभा निवडणूकीच्या आधी मंडप उतऊन घेऊन पूर्वीसारखाच नवा मंडप उभारणीला परवानगी दिली. तसेच गरुड मंडप उभारणीच्या कामाचा ठेका पुरातत्व विभागानेच साताऱ्यातील ओसवाल कंस्ट्रक्शनकडे दिला.
सप्टेंबर महिन्यात ओसवाल कंट्रक्शनने गरुड मंडप उतरुन घेतला. दरम्यानच्या काळात चंद्रपूर येथून सागवानी लाकूड आणले. टेंबलाई टेकडीवर उभारलेल्या मोठ्या शेडमध्ये लाकुड नेले. या लाकडापासून जुन्या गरुड मंडपाप्रमाणे नवा गरुड मंडप तयार साकारण्याला सुरुवात केली. गेल्या पाच महिन्यात मंडपाचे सर्व 48 खांबांची निर्मिती पूर्ण झाली आहे. यामध्ये मंडपाचा डोलारा पेलणारे 18 फुटी 10, साडे अकरा फुटी 22, 4 लहान, सदरेभोवती उभारल्या जाणारे साडे बारा फुटी 12 खांबांचा समावेश आहे.
सध्या मंडपाचे टेंबलाई टेकडीवरील शेडमध्ये मंडपाचे सिलिंग बनण्याचे काम सुरु आहे. येत्या काही दिवसात मंडपाचे खांब उभारुन त्यावर सिंलीग करण्यात येईल. तसेच बाहेरील व अंतरंगातील लहान मोठ्या खांबांमध्ये कमानी लावल्या जातील. कमानी लावण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच छत करण्याला सुरुवात केली जाईल. या छताचे काम पूर्ण झाल्यानंतर पत्रा घालण्यात येतील. पत्र्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कौले बसवले जातील. संपूर्ण मंडप उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याला पॉलिश करण्यात येईल. पॉलिश करणे हे मंडपाचे शेवटचे काम असणार आहे.
- पावसाळ्यातही काम सुरुच राहणार…
येत्या दीड–दोन महिन्यात पावसाला सुऊवात होईल. पाऊस आहे म्हणून गऊड मंडप उभारणीचे काम थांबणार नाही. शिवाय मंडप उभारणी कामात पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून जागेवरच मोठे पत्र्याचे शेड केले जाणार आहेत. तसेच मंडपासाठी बनवलेल्या लाकडी भागांवर पावसाचा परिणाम होऊ नये याचीही दक्षता घेतली जाणार आहे.
शिवराज नाईकवाडे (सचिव : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती)
- नगारखान्याचे कामही जुन–जुलै पूर्ण करणार…
गऊड मंडपाबरोबरच दुरवस्थेत गेलेला अंबाबाई मंदिराच्या महाद्वारानजिकचा नगारखानाही उतऊन घेऊन त्या जागी पुर्वीसारखाच नगारखाना उभारणीचे काम सध्या सुऊ आहे. सागवानी लाकडापासून नगारखान्याचे सहा खांब साकारले आहेत. या सहाखांबामधील नक्षीदार पाच कमानीही पूर्वीसारख्याच नव्याने बनवल्या आहेत. सध्या सुऊ असलेले नगारखान्याचे सिलिंगचे पूर्णत्वाला आले आहे. खांब, सिलिंग, छत्र व कमानींचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर पत्रे टाकण्यात येतील. तसेच या पत्र्यांवर कौले टाकून संपूर्ण नगारखान्याला पॉलिश केले जाईल. येत्या जुन–जुलैपर्यंत नगारखाना उभारणीचे काम पूर्ण केले जाईल.
शिवाजी सुतार (सहायक कंत्राटदार : ओसवाल कंट्रक्शन)








