रत्नागिरी :
शहरानजीकच्या चंपक मैदान येथे आंबा बागेत आंबे काढणाऱ्या तरुणाला लगतच्या विद्युत तारेमुळे प्राण गमवावा लागला. आंबे काढताना घळ विद्युत तारेला लागून खेडमधील रहिवासी असलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश राजू इलम (30, रा. पोसरे ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत तऊणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी 5 एप्रिल रोजी सकाळी 9.15 च्या सुमारास घडली. महेश इलम हा आंबा सिझन असल्याने रत्नागिरी येथील अनिल नार्वेकर यांच्याकडे आंबे काढण्यासाठी कामाला होता.
शनिवारी सकाळी 8.45 च्या सुमारास चंपक मैदान येथील आंब्याच्या झाडावरील आंबे काढत होता. त्यावेळी झाडाला लागून असलेल्या विद्युत तारेला हातातील घळ लागून त्याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे महेश हा झाडावर जखमी अवस्थेत राहिला होता. त्याला इतर सहकाऱ्यांनी झाडावऊन उतऊन जिल्हा शासकीय ऊग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








