बेळगाव : साधना क्रीडा संघ बेळगाव यांच्यावतीने राज्यस्तरीय निमंत्रित संघ वरिष्ठांची खो-खो स्पर्धा शनिवार दि. 19 व 20 एप्रिल रोजी बेळगाव मधील वडगाव येथील कन्नड शाळा नंबर 14 (जेल शाळा) मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बेळगाव परिसरातील खो-खो क्रीडाप्रेमींना भव्य स्पर्धा पहावयास मिळणार आहेत.
सदर स्पर्धेमध्ये कर्नाटकातील 16 नामवंत खो-खो संघ भाग घेत असून या स्पर्धा साखळी आणि बादफेरी पद्धतीने दिवस-रात्रीची खेळविली जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू भाग घेत असून आधुनिक पद्धतीच्या अल्टिमेट खो-खो स्पर्धा प्रमाणे या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेतील नवीन नियमानुसार सहा पाट्यांच्या खो खो मैदानावर प्रत्येक 7 खेळाडूंचा संघ भाग घेत आहेत.
या स्पर्धेमध्ये विजेत्या संघांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांक घेतलेल्या संघांना साधना क्रीडा संघ चषक आणि रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे. परिसरातील क्रीडापटूंना क्रीडा स्पर्धेत प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील नवीन खो-खो क्रीडापटू तयार व्हावेत या उद्देशाने साधना क्रीडा संघाच्या वतीने गेल्या वर्षीपासून अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. तेव्हा परिसरातील खेळाडूंनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा. असे आव्हान साधना क्रीडा संघाचे अध्यक्ष यांनी केले आहे.









