इंफाळ :
मणिपूरमध्ये सैन्य आणि आसाम रायफल्सने मणिपूर पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपीसोबत मिळून संयुक्त मोहीम राबविली आहे. या मोहिमेदरम्यान 6 उग्रवाद्यांना अटक करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. ही मोहीम इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, काकचिंग, चुराचांदपूर आणि विष्णुपूर जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आली आहे. याचबरोबर दोन उग्रवाद्यांना अपहरण प्रकरणी अटक करण्यात आली असून एका ओलिसाची मुक्तता करण्यास यश मिळाले आहे. ताब्यात घेण्यात आलेले उग्रवादी आणि शस्त्रास्त्रांना मणिपूर पोलिसांकडे सोपविण्यात आले. ही कारवाई उग्रवादाच्या विरोधात मोठे यश मानले जात आहे.









