भुवनेश्वर
ओडिशाच्या भुवनेश्वरनजीक उत्तरा चौकात रविवारी पर्यटक बस उलटल्याने एका बांगलादेशी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत. मृत बांगलादेशी नागरिकाचे नाव नुनीबाला नाथ होते. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. 70 बांगलादेशी भाविकांना तीर्थनगरी पुरी येथे नेत असलेली बस रविवारी पहाटे एका ख•dयात कोसळली. या दुर्घटनेनंतर चालक तेथून फरार झाला. स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना एम्स भुवनेश्वरमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे









