भाजप स्थापनादिनी पक्षाध्यक्ष न•ांचे वक्तव्य : राजपथाला कर्तव्यपथ नाव दिले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपने रविवारी स्वत:चा 46 व्या स्थापनादिन साजरा केला असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सर्वांनी पक्षाच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत पक्षाची विचारसरणी आणि धोरणांबद्दल विचार मांडले आहेत. भाजपने नेहमीच स्वत:च्या विचारसरणीसोबत उभे राहत देशाच्या विकासाची दिशा निश्चित केली आहे. पक्षाने सत्तेसाठी कधीच स्वत:च्या तत्वांशी तडजोड केली नाही. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करणे, राम मंदिराची उभारणी आणि तीन तलाक प्रथा संपुष्टात आणण्याचे महत्त्वाचे निर्णय पक्षाने स्वत:च्या आश्वासनांच्या अंतर्गत घेतले असल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे. नवा वक्फ कायदा लागू करण्याचा उद्देश वक्फच्या पैशांचा योग्यप्रकारे वापर सुनिश्चित करणे आहे. हा पैसा मुस्लिम समुदायाचे शिक्षण, आरोग्य आणि रोजगारावर खर्च होणार आहे. पक्ष वक्फ बोर्डाला नियमांनुसार चालविण्याचा प्रयत्न करेल. कारण अनेक देशांमध्ये सरकार वक्फ बोर्ड संचालित करत असल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या सदस्यांच्या संख्येत मोठी वाढ
नड्डा यांनी यावेळी भाजप सदस्यांच्या संख्येवर देखील गर्व व्यक्त केला. पक्षाचे 13.5 कोटीपेक्षा अधिक सदस्य आहेत. ज्यातील 10 लाख सक्रीय कार्यकर्ते असून 6 लाख बूथ अध्यक्ष आहेत. याचबरोबर पक्षाचे नेते 5 लाख बूथ आणि 1 लाख वस्त्यांपर्यंत जाणार आहेत, 7 एप्रिल ते 13 एप्रिलपर्यंत होणाऱ्या यात्रेचा हिस्सा म्हणून हे कार्य केले जाणार आहे. 14 एप्रिल रोजी संविधान गौरव दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण केले जाणार आहे. तसेच काँग्रेसच्या घटनाविरोधी पावलांची जनतेला आठवण करून दिली जाणार असल्याचे नड्डा यांनी सांगितले आहे.
भाजपची ऐतिहासिक वाटचाल
आमच्या विचारसरणीची राजकारणातील वाटचाल 1951 मध्ये एका राजकीय आंदोलनाच्या स्वरुपात झाली होती. 1977 मध्ये आमचा पक्ष जनता पक्षात सामील झाला आणि मग पुढील काळात भाजपच्या एक नव्या पर्यायी राजकीय व्यवस्थेची सुरुवात झाली. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. राम मंदिर उभारणीच्या दिशेने भाजपने मोठा संघर्ष केला आहे. पक्षाने नेहमीच राम मंदिर उभारणीसाठी कार्य केल्याचे नड्डा म्हणाले.
कमळ चिन्ह विश्वासाचे प्रतीक
कमळाचे चिन्ह आता देशवासीयांच्या मनात विश्वास आणि आशेचे नवे प्रतीक ठरले आहे. मागील एक दशकात भाजपने सेवा, सुरक्षा आणि सांस्कृतिक जगाराचे जे कार्य केले आहे, ते आगामी काळात मैलाचे दगड ठरतील. भाजपच्या पायात देशभक्तीचे बीज रोवून कोट्यावधी राष्ट्रभक्तांचा वटवृक्ष उभा करण्याचे काम करणाऱ्या सर्व महापुरुषांना मी नमन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप विकसित आणि प्रत्येक क्षेत्रात श्रेष्ठ भारताच्या निर्मितीच्या दिशेने निरंतर कार्य करत राहणार असल्याचे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी काढले आहेत.
देशहित हेच भाजपचे लक्ष्य
भगवान रामाचे मंदिर उभारणीचे आंदोलन लोकापर्यंत पोहोचविणे असो किंवा कलम 370 हद्दपार करण्याचा संकल्प असो किंवा गरीब, महिलांचे कल्याण करणे असो भाजपने स्वत:च्या स्थापनेपासूनच देशहिताला स्वत:चे सर्वात मोठे लक्ष्य मानले आहे. स्वत:च्या चार दशकांच्या प्रवासात भाजपने एक राजकीय पक्ष कशाप्रकारे वारशाचा सन्मान, प्रत्येक गरीबाला घर, अन्न, आरोग्य विमा आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एकत्रितपणे संकल्पबद्ध राहू शकतो हे दाखवून दिले असल्याचा दावा शाह यांनी केला.









