वृत्तसंस्था / सुझुका (जपान)
रविवारी येथे होणाऱ्या जपान ग्रा प्री एफ-1 मोटार शर्यतीचे पोल पोझिशन रेडबुल चालक मॅक्स व्हर्स्टेपनने मिळविले आहे. शनिवारी येथे झालेल्या पात्र फेरीमध्ये व्हर्स्टेपनने फेरारी चालक चार्लस लेकरेक तसेच अन्य प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.
शनिवारी पात्रफेरीची शर्यत आयोजित केली होती. मॅक्स व्हर्स्टेपनने 1 मिनिट, 26.983 सेकंदाचा अवधी घेत पोल पोझिशन पटकाविले. एफ-1 मोटार शर्यतीच्या इतिहासामध्ये व्हर्स्टेपनने आतापर्यंत 41 वेळा विविध स्पर्धांमध्ये पोल पोझिशन मिळविल्या आहेत. व्हर्स्टेपनने आतापर्यंत एफ-1 प्रकाराच्या 63 शर्यती जिंकल्या आहेत. या क्षेत्रात लेव्हीस हॅमिल्टनने सर्वाधिक म्हणजे 105 एफ-1 शर्यती तर जर्मनीच्या मायकेल शुमाकरने 91 एफ-1 शर्यती जिंकण्याचा पराक्रम केला आहे.









