सांगली :
सकारात्मक दृष्टीकोन नियंत्रण अधिकारी, खाते प्रमुख यांनी आपल्या कामात ठेऊन काम करावे तक्रारी आणि तक्रारींचे निराकरणासाठी सर्वांनी प्रयत्न अशी सूचना प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी यांनी दिले होते. त्यानुसार आज सर्व यंत्रणा कार्यरत झाल्याचे निदर्शनास येत आहे.
सांगली येथील गवळीगल्ली खुल्या प्लॉटमध्ये अस्वच्छता केल्याची तक्रार प्राप्त होती, स्वच्छता निरीक्षक यांनी याकूब मद्रासी मुख्य स्वच्छता निरीक्षक यांच्या उपस्थितीत जागेवर जाऊन पाहणी केली तसेच स्वच्छता देखील करून घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत अशी माहिती मद्रासी यांनी दिली आहे.
मिरज येथे नागरिक संबाद व तक्रार निवारण उपक्रम अंतर्गत मुजावर गल्ली येथील मैनुद्दीन गाडद यांनी केलेल्या विनापरवाना बांधकाम व बौद्ध बसाहत येथील कांबळे यांचे रस्त्यावरील अतिक्रमण तक्रारींची पाहणी नगरचना मिरज विभागामार्फत पाहणी करून संबंधिताना नोटीस देण्यात आली आहे. सदरची कामगिरी नगर अभियंता वैभव वाघमारे यांनी केली आहे. उर्वरित तक्रारी देखील दखल घेऊन निकाली काढण्यासाठी सूचना अडसूळ यांनी केल्या आहेत, नागरिकांनी समस्याचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. नागरिक संवाद, तक्रार निवारण प्रभाग निहाय प्रत्येक बुधबार आयोजित केला होता, नागरिक संबाद मोहीम राबविली जाणार आहे.








