रत्नागिरी :
शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे पोलिसांनी रिक्षा चालकाच्या ताब्यातून अर्धा किलो गांजा हा अमली पदार्थ जप्त केल़ा रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आल़ी लक्ष्मण रवी नायर (34, रा. नाचणकर चाळ, मिरजोळे–एमआयडीसी) असे संशयिताचे नाव आह़े या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविऊद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केल़ा
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हे 3 एप्रिल रोजी रत्नागिरी शहर परिसरात गस्त घालत असताना मिरजोळे एमआयडीसी रत्नागिरी परिसरामध्ये एक रिक्षा चालक संशयित हालचाली करत असल्याचे आढळल़े त्याच्याकडे चौकशी केली असता हा इसम पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. या पथकाने त्याच्या ताब्यातील पिशवी तपासली असता त्यामध्ये 477 ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ सापडल़ा संशयिताविऊद्ध पोलिसांनी एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 22(अ), 27 अन्वये गुन्हा दाखल केल़ा ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, गणेश सावंत, प्रवीण खांबे, सत्यजित दरेकर यांनी केल़ी








