भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी
बेळगाव : येळ्ळूर ग्रा. पं. भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हा नागरी हक्क जारी निर्देशनालय विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्राम पंचायतीला भेट देऊन चौकशी केली आहे. शिवाय याबाबतचा अहवाल लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. येळ्ळूर ग्रा. पं. मध्ये 2018-19 या सालामध्ये 14 व्या वित्त आयोग योजनेंतर्गत विविध विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अॅड. सुरेंद्र उगार यांनी जिल्हा नागरी हक्क जारी निर्देशनालय विभागाकडे केली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी ग्रा. पं. ला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली आहे. ग्रा. पं. कार्यक्षेत्रात 29 विकासकामे राबविण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार करून निधी लाटण्याचा प्रकार घडला आहे. शिवाय याबाबत पंचायतराज खाते, कर्नाटक लोकायुक्त आणि जि. पं. कडे तक्रार देण्यात आली आहे. मात्र अद्याप या प्रकरणाची चौकशी झाली नसल्याचेही सांगण्यात आले आहे.









