वृत्तसंस्था / दुबई
पाक क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील झालेल्या दुसऱ्या सामन्यात षटकांची गती राखता न आल्याने पाक क्रिकेट संघाला आयसीसीच्या नियमानुसार दंड ठोठावण्यात आला आहे.
पाक आणि न्यूझीलंड यांच्यातील हा दुसरा वनडे सामना हॅमिल्टनमध्ये खेळविला गेला. न्यूझीलंडने हा दुसरा सामना 84 धावांनी जिंकून या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या दुसऱ्या सामन्यात पाकच्या गोलंदाजांना षटकांची गती राखता न आल्याने पाकचा कर्णधार मोहम्मद रिझवानला दोषी ठरविण्यात आले. कर्णधार रिझवानने हा गुन्हा मान्य केला. त्यामुळे आता पाकच्या खेळाडूंना मिळणाऱ्या मानधन रक्कमेतील 5 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. या मालिकेतील आता तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी खेळविला जाणार आहे.









