मसूर :
राजकारणात मी कधीही खोट्या थापा किंवा खोटी आश्वासने देत नाही. मी या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण कार्यक्षेत्रात फिरलो असून चारही तालुक्यात सर्वत्र चांगले वातावरण आहे. त्यामुळे विरोधकांची दोन पॅनेल आणि अपक्ष उमेदवारांच्या मतांच्या बेरजेपेक्षा जास्त मतदान पी. डी. पाटील पॅनेलला होईल, असा विश्वास माजी सहकार मंत्री व सह्याद्री कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला, तर 2800 ते 2900 रुपये दर देणारे काही खासगी कारखानदार स्वत?च्या राजकीय स्वार्थासाठी सहकारात आदर्शवत ठरलेल्या आणि 3254 रुपये ऊस दर देण्राया सह्याद्री कारखान्याची निवडणूक लढवत आहेत, त्यांना तो नैतिक अधिकार आहे का? याचा सह्याद्रीच्या स्वाभिमानी सभासदांनी विचार करावा. त्यांनी राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सह्याद्रिची बदनामी करू नये, स्वाभिमानी सभासद ही बदनामी खपवून घेणार नाहीत, असे त्यांनी ठणकावून सांगितले
मसूर (ता.कराड) येथे सह्याद्रि कारखाना निवडणुकीत पी.डी.पँनेलच्या सांगता सभेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद पंडितराव जगदाळे होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, शहाजी क्षीरसागर, राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस अजितराव पाटील (चिखलीकर), माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, तानाजीराव साळुंखे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक लहूराज जाधव, संगीता साळुंखे प्रकाश जाधव, माणिकराव पाटील, लालासाहेब पाटील, सयाजीराव पाटील, बाळासाहेब जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, कारखान्यावर कर्ज आहे म्हणता मग कर्ज असलेल्या कारखान्याकडे का लक्ष देता? केवळ राजकारण म्हणून व स्वत?च्या स्वार्थासाठी चांगले चाललेल्या कारखान्यात निवडणूक लागली आहे. विरोधकांकडून प्रचार करताना अरेरावी व एकेरी उल्लेख केला जात असून आम्ही मात्र कधीही सत्ता आली म्हणून उन्माद केला नाही. गेली म्हणून खचून गेलेलो नाही. गेली अनेक वर्ष अनेक वारस नोंदी पूर्ण केल्या आहेत. मात्र केवळ तांत्रिक अडचणीमुळे काही वारस नोंदी राहिल्या आहेत. त्याही योग्य कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर पूर्ण करू, कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेऊ, असे सांगत तुमच्या कारखान्याच्या कर्मच्रायांची अवस्था काय आहे तेही एकदा सांगा, असे आव्हानही दिले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या कारखान्यासाठी सह्याद्रि हे नाव निश्चित केले होते. चव्हाण साहेबांनी दिलेले ते नाव बदलण्याचा कोणताही प्रश्न येत नाही. उलट सह्याद्रि हे नावच नेहमीच प्रेरणा देत राहील, असा विश्वास व्यक्त केला. या निवडणुकीत पी डी पाटील पॅनलच्या वतीने 107 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी फक्त 21 अर्ज शिल्लक राहिले. उर्वरित उमेदवारांनी मोठ्या मनाने अर्ज माघारी घेत प्रचारात गावोगावी आघाडी घेतली आहे. त्यांनी दुसरे पॅनल किंवा अपक्ष अर्ज ठेवण्याची कोणतीही भूमिका घेतली नाही.
रमेश जाधव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. नरेश माने यांनी प्रास्ताविक केले. माजी सरपंच प्रकाश माळी यांनी आभार मानले.
- नेते म्हणाले…..
सहकारातील निवडणुकीत गट तट न पाहता लोक एकत्रित असतात त्याप्रमाणेच या निवडणुकीत सर्वपक्षीयांचा पाठिंबा मिळाला आहे…सुनील माने यशवंत विचार जपणारा स्वाभिमानी सभासद संयम राखत तुमचा अहंकार मताच्या रूपाने नक्की घालवेल… देवराज पाटील
देशाचे थोर नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक म्हणजेच सह्याद्री कारखाना होय. ते जपण्यासाठी सहकार्य करा. अजितराव पाटील– चिखलीकर








