पाचगाव / दयानंद जाधव :
आर के नगर येथे करवीर पोलीस स्टेशन अंकित पोलीस चौकी आहे. ही पोलीस चौकी नेहमी बंद असते. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर अवैध व्यवसाय आहेत. मात्र याकडे पोलिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे .
आर के नगर येथे करवीर पोलीस स्टेशन अंकीत पोलीस चौकी आहे. या पोलीस चौकीसाठी आर के नगर सोसायटीने एक खोली उपलब्ध करून दिली आहे. संवेदनशील असण्राया पाचगाव,आर के नगर, मोरेवाडी परिसरात अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत असतात. गाडी मधील बॅटरी चोरी, पाण्याच्या मोटर चोरने अशा घटना वारंवार घडत आहेत.त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आर के नगर येथे पोलीस चौकी नेहमी सुरू असणे गरजेचे आहे. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून आर के नगर येथील पोलीस चौकी बंद स्थितीतच आहे.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आर के नगर येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू राहावी आणि परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
- पोलीस चौकी समोरच अवैध व्यवसाय
- या पोलीस चौकीपासून समोरच हाकेच्या अंतरावर अवैध व्यवसाय सुरू आहेत. या अवैध व्यवसायामुळे परिसरातील विक्रेते,नागरिक त्रस्त आहेत .आर के नगर, पाचगाव परिसरातील सर्व नागरिकांना या अवैध व्यवसायाबद्दल माहिती आहे. भर चौकात सुरू असणारे हे अवैध व्यवसाय पोलिसांना मात्र का दिसत नाहीत?या मागचे गौड बंगल काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
आर के नगर मुख्य चौकात नेहमी ट्रॅफिक जाम
- आर के नगर मुख्य चौकात संध्याकाळच्या वेळेस अनेक वेळा ट्रॅफिक जामची समस्या भेडसावत आहे. यामुळे वाहन धारक त्रस्त आहेत. पोलिसांनी तातडीने यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
नामदेव गोंधळी, नागरिकएकाच दुकानात दोन वेळा चोरी
आर के नगर परिसरातील एका दुकानात दोन वेळा चोरी झाली. पहिल्यांदा चोरी झाली म्हणून दुकानदाराने दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा लावला. दुस्रया वेळी पुन्हा त्याच दुकानात चोरी झाली.यावेळी चोरट्याने दुकानांमधील कॅमेरा सॉकेट सह काढून नेला. या दुकानासमोर शासनाने रस्त्यावर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र हे कॅमेरे बंद आहेत. परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
- पोलीस चौकी सुरु असणे गरजेचे
संवेदनशील असण्राया पाचगावची लोकसंख्या सुमारे 40 हजर आहे. आर के नगर,पाचगाव,मोरेवाडी साठी आर के नगर येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू राहणे गरजेचे आहे. पोलीस चौकीमुळे भुरट्या च्रोयावर वचक राहण्यास मदत होईल.
धनाजी पाटील, नागरिक
- महत्त्वाचा बंदोबस्त आणि तपासा वेळीच पोलीस चौकी खुली
गुन्हे दाखल करण्याचे काम पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येते. महत्त्वाचा बंदोबस्त आणि तपास असेल तेव्हाच पोलीस चौकी खुली ठेवण्यात येते.
किशोर शिंदे, पोलीस निरीक्षक करवीर








