बिबी :
वाघोशी (ता. फलटण) गावातील सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील प्रवीण विश्वास पवार (वय 40 वर्षे) याने सध्या सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांमध्ये 49 रुपयांच्या माय इलेव्हन नामक खेळात तब्बल तीन कोटी रुपये व महिंद्रा थार गाडीचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जिंकले आहे. याबद्दल प्रवीणवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रवीण पवार हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवक लातूरमध्ये खाजगी कंपनीमध्ये कामाला आहे. इयत्ता बारावीपर्यंत त्याचे शिक्षण झालेले आहे. प्रवीणने सोमवार दि. 31 मार्च रोजी झालेल्या मुंबई व कोलकत्ता संघातील लढतीची माय इलेव्हनमध्ये मुंबईच्या बाजूने स्वत:ची टीम तयार केली होती. त्यामध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला आहे. या बदल्यात माय इलेव्हनकडून तीन कोटी रुपये व महिंद्रा थार गाडी जिंकली आहे. याबाबत प्रवीण पवार याचे अभिनंदन होत आहे.








