रत्नागिरी :
चाफे येथे अपघातानंतर ट्रक पेटवून दिल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केल़ा. नंदू बेंद्रे, संकेत ढवळे व दीपक चौगुले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत़ मंगळवारी दुपारी ट्रक–दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होत़ा यानंतर संतप्त झालेल्या संशयित आरोपींकडून पेट्रोल ओतून ट्रक पेटविण्यात आला असा आरोप ठेवण्यात आला आह़े
दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रकचालक त्याठिकाणीच न थांबता दुचाकीला फरफटत पुढे घेऊन गेल़ा स्थानिकांनी आरडा–ओरडा केल्यानंतरही ट्रकचालकाने त्याकडे दुर्लक्ष केल़े ट्रक काही अंतरावर जाऊन थांबल्यावर संशयित आरोपी त्याठिकाणी पोहोचल़े तसेच प्लास्टिकच्या बाटलीमधील पेट्रोल ओतून ट्रक पेटवून दिला, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े.








